Latest Banking jobs   »   Happy Maharashtra Day | Adda247 Wishes...

Happy Maharashtra Day | Adda247 Wishes You The Success in 2020

महाराष्ट्र दिन विशेष:महाराष्ट्राची शैक्षणिक वाटचाल

प्रसिद्ध कवी गोविंदाग्रज महाराष्ट्राची महती गाताना म्हणतात,

“मंगल देशा पवित्र देशा

महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा

माझा हा श्री महाराष्ट्र देशा”!!!

आज 1 मे महाराष्ट्र दिन या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम बांधवाना adda 247 तर्फे हार्दिक शुभेच्छा!!! या पवित्र दिनाचे अवचित्य साधून सदरील लेखात आपण महाराष्ट्राची शैक्षणिक वाटचाल याचा आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्र दिन 1 मे लाच का

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी मोठी चळवळ झाल्याची इतिहासात नोंद आहे.

Upcoming Bank Exams 2020 Government Jobs for Graduates 2020 Consumer Price Index: Definition, Types, Measurement

स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्र हा कामगारांच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवत आला आहे. तसेच भारतातील पहिली कामगार संघटना मुंबई, महाराष्ट्रात स्थापन झाली. आशा प्रकारे कायम कामगार लढ्याला साथ देणाऱ्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा दिन हा ‘जागतिक कामगार दिनी’ असावा अशी संकल्पना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडली होती. म्हणून महाराष्ट्र दिन १ मे ला असतो.

MAHA BHARTI MAHA BATCH | Online Live Classes

स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रगती

एकीकडे ब्रिटिश राजवटी खालील भारतात श्वास घेणं कठीण होतं तर तिकडे महाराष्ट्रात मात्र नवबुद्धीजीवी नवशिक्षित समाजसुधारकांची एक पिढीच घडत होती. यातील अग्रगण्य नावे म्हणजे स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले, न्यू इंग्लिश स्कूलची पुण्यात मुहर्तमेढ रोवणारे तरुण लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, स्त्री शिक्षणासाठी खस्ता खाल्लेले भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे तसेच स्वावलंबनातून शिक्षण ब्रिद घेऊन रयत शिक्षण संस्थेची निर्मिती करणारे कर्मवीर भाऊराव पाटील असे किती तरी शिक्षण महर्षी महाराष्ट्राने घडवले, वाढवले. याच मुळे महाराष्ट्रातील तरुण सर्वोच्च शिखर गाठू शकला. महाराष्ट्र दिनी या महात्म्यांचे नमन करूया त्याच बरोबर बदलत्या शैक्षणिक पद्धतीचा हिस्सा म्हणून adda 247 ने हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मराठीत पाऊल ठेवण्याचे ठरविले आहे. Adda 247 मराठी बँकिंग फौंडेशन कोर्स आणि महाभरती कोर्स खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तरुणांच्या स्वप्नांना एक बळ देईल यात शंका नाही.

Bank Foundation LIVE Batch 2020 | In Marathi | For SBI, IBPS And RBI | Live Classes

Click Here to Register to Share Your Feedback and Get Counscelling from Expert

सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था 

महाराष्ट्रात सध्या अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. शिक्षक प्रशिक्षण संस्थांपासून ते अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी व्यवस्थापन, कायदा इ. सर्वच क्षेत्रातल्या संस्था राज्यात आहेत.

सद्यस्थितीत महाराष्ट्रात एक केंद्रीय विद्यापिठ, 19 राज्य विद्यापीठे असून 4 कृषी विद्यापीठे आहेत. भारतातील नामवंत अभियांत्रिकी संस्था IIT पवई महाराष्ट्रात मुंबई येथे आहे.

पुणे शहराला राज्याची शैक्षणिक राजधानी म्हटले जाते. पंडित जवाहरलाल नेहरू पुणे शहराचा उल्लेख ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ असा करत असतं.

देश विदेशातील विध्यार्थी पदवी व पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्राची निवड करतात.

महाराष्ट्राच्या उत्तुंग शैक्षणिक भरारीत आता आपला अर्थात adda 247 चा समावेश झाला आहे. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान शैक्षणिक प्रगतीचा आलेख चढता ठेवणे व बदलत्या स्पर्धा विश्वात स्वतःला सक्षम करण्यासाठी तुम्हाला साथ देईल आता adda 247 तेही आपल्या मराठी मातृभाषेत!!

SBI PO 2020: Preparation Tips, Strategy, & Study Plan Best Approach Towards Solving Error Detection In Banking Exam How to Target SBI PO 2020

TOPICS:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *